Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»रजोनिवृत्ती व पीसीओडी विषयावरील राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन महिलांनी वेळेवर आरोग्य तपासणी करून घ्यावी- मेघना साकोरे-बोर्डीकर
छत्रपती संभाजीनगर

रजोनिवृत्ती व पीसीओडी विषयावरील राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन महिलांनी वेळेवर आरोग्य तपासणी करून घ्यावी- मेघना साकोरे-बोर्डीकर

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comAugust 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर, दि. ३० (जिमाका) – महिलांनी रजोनिवृत्ती व पीसीओडीसंदर्भातील आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर तपासणी करून तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच आरोग्य यंत्रणेने याबाबत व्यापक जनजागृती करून आवश्यक आरोग्यसेवा प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

महिलांच्या आरोग्याशी संबंधित रजोनिवृत्ती (Menopause) आणि पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOD/PCOS) विषयक आरोग्यसेवा अधिक सक्षम व परिणामकारक करण्याच्या उद्देशाने राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन महात्मा गांधी मिशन (एम.जी.एम.) वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉलमध्ये सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते झाले.

आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे डॉ. कैलास बाविस्कर, उपसंचालक डॉ. आशीष भारती, डॉ. कांचन वानोरे, डॉ. आशिष भारती, डॉ. दयानंद मोतीपवळे, डॉ. प्रशांत हिंगणकर (युनिसेफ), डॉ. मंगेश गढरी (युनिसेफ), डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. संतोष कडले, डॉ. सुरेश रावते, डॉ. विनायक खेडकर, डॉ. अभय धानोरकर यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, तज्ज्ञ आणि मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

आरोग्य उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत मराठवाडा विभागातील स्त्रीरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

कार्यशाळेत रजोनिवृत्ती व्यवस्थापन, पीसीओडीचे निदान व उपचार, समुपदेशन, आरोग्यदायी जीवनशैली, मानसिक व शारीरिक आरोग्य, आधुनिक उपचारपद्धती आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करण्यात आले. तसेच चर्चासत्र आणि प्रश्नोत्तर सत्राच्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या ज्ञान व कौशल्यात भर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी तज्ज्ञांनी सांगितले की, बदलती जीवनशैली, अयोग्य आहार, शारीरिक हालचालींचा अभाव आणि वाढता ताण यामुळे पीसीओएसचे प्रमाण वाढत असून वेळेत निदान, योग्य समुपदेशन आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब केल्यास हा विकार प्रभावीपणे नियंत्रणात ठेवता येऊ शकतो.

महिलांच्या आरोग्यविषयक सेवांची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी आणि रजोनिवृत्ती तसेच पीसीओडीग्रस्त महिलांना दर्जेदार व सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

By Maharashtranewstimes2026@gmail.comSeptember 8, 20260
Spread the love

कन्नड:- शमाबी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आयशा कोचिंग क्लासेसचे संचालक वसीम शेख यांनी शैक्षणिक,…

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026

विशेष लेख : विद्यार्थी हिंसक का होतो?

September 3, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.