छत्रपती संभाजीनगर, दि. १ : जिल्ह्यातील नागरिकांचे महसूलविषयक प्रश्न जलदगतीने सोडविण्यासोबतच शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले.
सूर्या लॉन्स, बीड बायपास येथे आयोजित जिल्हास्तरीय शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री अतुल सावे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व लाभार्थी उपस्थित होते.
२६ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मतदारसंघनिहाय हे अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ ‘एकाच छताखाली, एकाच ठिकाणी’ मिळावा, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
या शिबिरात सातबारा, फेरफार, वारस नोंद, उत्पन्न व रहिवासी दाखले, जमीनविषयक नोंदीतील दुरुस्ती, प्रलंबित अर्जांचा पाठपुरावा तसेच महसूलविषयक इतर प्रशासकीय बाबींचे तात्काळ निवारण करण्यावर भर देण्यात आला आहे.
नागरिकांना शासकीय कामांसाठी वारंवार कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत आणि शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश यावेळी देण्यात आले. अभियानस्थळी विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देणारे स्टॉल्सही उभारण्यात आले होते.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरातून नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा — पालकमंत्री संजय शिरसाट
Related Posts
Add A Comment

