आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किनगाव येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर सुंदर व प्रेरणादायी भाषणे सादर केली.
याप्रसंगी श्री. पंकज पवार, श्री. काकासाहेब चव्हाण तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. देशमुख मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रप्रेम, स्वराज्याची प्रेरणा आणि लोकजागृतीतील योगदानाबद्दल तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, समाजप्रबोधन आणि सामाजिक समतेच्या विचारांबद्दल सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी या महान व्यक्तींचे विचार आचरणात आणून प्रामाणिकपणा, परिश्रम, शिक्षण आणि देशप्रेमाची मूल्ये जोपासावीत, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी आणि उपस्थित मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून महापुरुषांना विनम्र अभिवादन केले. श्रीम.बागुल मॅडम यांनी आभार मानले . कार्यक्रमास उपस्थित कांबळे मॅडम कोंडके मॅडम उपस्थित होते .
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम
Related Posts
Add A Comment

