फुलंब्री तालुक्यातील सांजुळ गावचे भूमिपुत्र श्री. पंडुरंग पाटील जाधव यांनी अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षात निस्वार्थीपणे आणि प्रामाणिकपणे कार्य केले आहे. पदाची अपेक्षा न ठेवता पक्षाच्या विचारधारेवर निष्ठा ठेवून जनसेवा आणि संघटनात्मक कार्याला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले.
काँग्रेस पक्षावरील त्यांची अढळ निष्ठा आणि एकनिष्ठता हाच त्यांच्या राजकीय जीवनातील खरा दागिना आहे. त्यांच्या दीर्घकाळच्या निस्वार्थ कार्याची आणि पक्षनिष्ठेची दखल घेत त्यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
सांजुळ गावच्या भूमिपुत्राला मिळालेली ही जबाबदारी म्हणजे गावाचा आणि फुलंब्री तालुक्याचा सन्मान असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. त्यांच्या नेतृत्वातून काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद आणखी वाढेल आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
श्री. पंडुरंग पाटील जाधव यांचे मनःपूर्वक अभिनंदन! पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
फुलंब्री तालुक्याच्या भूमिपुत्राची जिल्हा काँग्रेस सचिवपदी निवड
Related Posts
Add A Comment

