आमचा अभिमान… आमचा स्वाभिमान… पुन्हा मैदानात!
फुलंब्री | प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी सभापती (कृषी उत्पन्न बाजार समिती, फुलंब्री) तसेच जिल्हा दूध संघाचे संचालक श्री. संदीप दादा बोरसे यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सामाजिक, सहकार आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय कार्य करणारे संदीप दादा बोरसे यांच्या या निवडीचे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांकडून मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे. त्यांच्या अनुभवाचा पक्ष संघटन बळकट करण्यासाठी निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
“आमचा अभिमान… आमचा स्वाभिमान… पुन्हा मैदानात!” या भावनेतून कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
ज्ञान सेतू परिवाराकडून श्री. संदीप दादा बोरसे यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

