Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

सातारा–देवळाईचा पाण्याचा यक्षप्रश्न सुटणार तरी कधी?

November 1, 2026

माईंड पॉवर कार्यशाळेतून मनाच्या शक्तीची ओळख करून देणार

November 1, 2026

छत्रपती संभाजीनगरकरांनो… स्वतःमधील शक्ती ओळखा आणि बदलाची सुरुवात करा!

October 31, 2026

Our Visitor

0 4 4 4 4 0
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»कैलासनगर स्मशानभूमीच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन; वर्षभरात साकार होणार आधुनिक ‘वैकुंठ धाम’
छत्रपती संभाजीनगर

कैलासनगर स्मशानभूमीच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन; वर्षभरात साकार होणार आधुनिक ‘वैकुंठ धाम’

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comJuly 30, 2026Updated:July 30, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर, दि. २६ : शहरातील ऐतिहासिक कैलासनगर स्मशानभूमीच्या सर्वांगीण पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज झाले. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि सीएसएन फर्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत असून, पुढील एका वर्षात आधुनिक आणि पर्यावरणपूरक ‘वैकुंठ धाम’ उभारण्याचे उद्दिष्ट आहे.

यावेळी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, महापौर समीर राजूरकर, महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्यासह लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी आणि सीएसएन फर्स्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री अतुल सावे म्हणाले, “प्रशासन, सामाजिक संस्था आणि सीएसआरच्या सहकार्याने उभे राहणारे असे समाजोपयोगी प्रकल्प ही काळाची गरज आहे. नागरिकांना अधिक दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.”

महापौर समीर राजूरकर यांनी शहराच्या विकासात सामाजिक संस्था आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगत, सीएसएन फर्स्टचा पुढाकार इतर संस्थांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी प्रत्येक व्यक्तीला सन्मानपूर्वक अखेरचा निरोप मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार असल्याचे सांगत या प्रकल्पासाठी पहिली देणगी जाहीर केली. सीएसएन फर्स्टचे माजी अध्यक्ष ऋषी बागला यांनीही देणगी देऊन उपक्रमाला पाठबळ दिले.

कैलासनगर स्मशानभूमी ही शहरातील सर्वात जुन्या स्मशानभूमींपैकी एक असून तिचा आधुनिक, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक विकास करण्यासाठी महानगरपालिका व सीएसएन फर्स्ट यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. प्रकल्पाची उभारणी आणि देखभाल सीएसएन फर्स्टकडून करण्यात येणार असून, आवश्यक नागरी सुविधा महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

प्रकल्पामध्ये १२ आधुनिक अग्नीसंस्कार केंद्रे, विद्युत शवदाहिनी, लँडस्केपिंग, शिवमूर्ती, पाण्याची टाकी, स्वच्छतागृहे, पार्किंग, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत, हरित क्षेत्र आणि नागरिकांसाठी बैठकीची व्यवस्था अशा अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येणार आहेत. परिसरात दाट वृक्षलागवड आणि हरित पट्टा विकसित करून पर्यावरणपूरक नियोजनालाही प्राधान्य दिले जाणार आहे.

प्रकल्पाचे वास्तुविशारद महेश साळुंके यांनी आधुनिक वास्तुरचना, पर्यावरणपूरक संकल्पना आणि पारंपरिक संस्कृतीचा सन्मान यांचा समन्वय साधणारा प्रकल्प आराखडा सादर केला.

हा पुनर्विकास प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहराला स्वच्छ, सुसज्ज, आधुनिक आणि सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार सुविधा उपलब्ध करून देणारे आदर्श ‘वैकुंठ धाम’ साकार होणार आहे

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

सातारा–देवळाईचा पाण्याचा यक्षप्रश्न सुटणार तरी कधी?

November 1, 2026

माईंड पॉवर कार्यशाळेतून मनाच्या शक्तीची ओळख करून देणार

November 1, 2026

छत्रपती संभाजीनगरकरांनो… स्वतःमधील शक्ती ओळखा आणि बदलाची सुरुवात करा!

October 31, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

सातारा–देवळाईचा पाण्याचा यक्षप्रश्न सुटणार तरी कधी?

By Maharashtranewstimes2026@gmail.comNovember 1, 20260
Spread the love

– दहा वर्षे महापालिकेत, कोट्यवधींचा महसूल; तरी नागरिकांच्या घशाला कोरड सातारा–देवळाई परिसराचा २०१६ मध्ये छत्रपती…

माईंड पॉवर कार्यशाळेतून मनाच्या शक्तीची ओळख करून देणार

November 1, 2026

छत्रपती संभाजीनगरकरांनो… स्वतःमधील शक्ती ओळखा आणि बदलाची सुरुवात करा!

October 31, 2026

डॉ. गोंधणे १३ नोव्‍हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे

October 31, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.