पिशोर | प्रतिनिधी : पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करंजखेडा येथून घरातून निघून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पिशोर पोलिसांनी तातडीने शोध घेत चाळीसगाव व छत्रपती संभाजीनगर येथून त्यांना सुखरूप ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
दि. २७ जुलै २०२६ रोजी करंजखेडा येथील मोसिन मुसा शेख (वय ३६, व्यवसाय शेती) आणि शकील खान फय्याज खान (वय ४०, व्यवसाय शेती) यांनी पिशोर पोलीस ठाण्यात माहिती दिली की, त्यांची अल्पवयीन मुले उमरेन शकील खान (वय १४) आणि अबूबकर मोसिन शेख (वय १३) हे दि. २४ जुलै रोजी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेले आहेत.
माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांनी तातडीने दखल घेत पोलीस हवालदार मोरे आणि पोलीस शिपाई अन्सार पटेल यांना मुलांचा शोध घेण्याचे आदेश दिले. तपासादरम्यान करंजखेडा परिसरासह कन्नड बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यातून दोन्ही मुले चाळीसगावच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर पोलिसांनी दोन्ही मुलांची शोधपत्रिका तयार करून आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांसह विविध सोशल मीडिया ग्रुपवर प्रसारित केली. तसेच चाळीसगाव परिसरातील सोशल मीडिया ग्रुपवरही शोधपत्रिका व्हायरल करण्यात आली. त्यानंतर चाळीसगाव येथील एका सोशल मीडिया ग्रुपच्या माध्यमातून दोन्ही मुले तेथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच पिशोर पोलिसांचे पथक तातडीने चाळीसगाव येथे रवाना झाले. तेथे उमरेन शकील खान हा मुलगा सुखरूप मिळून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता अबूबकर मोसिन शेख हा छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या बसने गेल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर बसस्थानक परिसरात मुलाच्या नातेवाईकांना थांबण्यास सांगितले. संबंधित बस तेथे पोहोचताच अबूबकर मोसिन शेख हा बसमधून उतरत असताना त्याला सुखरूप ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर दोन्ही मुलांना पिशोर पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
अल्पवयीन मुले सुखरूप मिळाल्याने पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पोलिसांनी वेळेचे गांभीर्य ओळखून तातडीने शोधमोहीम राबविल्यामुळेच दोन्ही मुले अल्पावधीत सुखरूप मिळाल्याचे सांगत पालकांनी पिशोर पोलिसांचे आभार मानले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक, कन्नड उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार मोरे आणि पोलीस शिपाई अन्सार पटेल यांनी केली.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
पिशोर पोलिसांची तत्पर कारवाई; चाळीसगाव व छत्रपती संभाजीनगर येथून दोन अल्पवयीन मुले सुखरूप
Related Posts
Add A Comment

