यादीतील कर्जरक्कम आणि KYC करताना दिसणाऱ्या रकमेत तफावत; शेतकऱ्यांना स्पष्ट मार्गदर्शनाची मागणी
कर्जमाफी योजनेची वेबसाइट सध्या अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने लाभार्थी शेतकऱ्यांना KYC प्रक्रिया पूर्ण करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच कर्जमाफी योजनेच्या लाभार्थी निवड यादीमध्ये काही खातेदार शेतकऱ्यांच्या नावासमोर कर्जाची रक्कम दीड लाख रुपये दर्शविण्यात आली आहे. मात्र, KYC प्रक्रिया करताना संबंधित शेतकऱ्यांच्या नावासमोर त्यापेक्षा कमी, म्हणजेच एक लाख किंवा त्यापेक्षा काही हजार रुपये रक्कम दिसत असल्याचे समोर आले आहे.
या रकमेतील तफावतीमुळे अनेक शेतकरी संभ्रमात पडले असून, KYC करावी की नाही, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. दरम्यान, संबंधित बँक अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना ‘तुम्ही फक्त KYC प्रक्रिया पूर्ण करा, उर्वरित रक्कम नियमानुसार मिळेल’, असे सांगण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मात्र, कर्जमाफीच्या रकमेत तफावत का दिसत आहे, KYC केल्यानंतर प्रत्यक्षात किती रक्कम मिळणार आहे आणि कमी दिसणारी रक्कम नंतर जमा होणार आहे का, याबाबत शासन आणि संबंधित विभागाने अधिकृतपणे स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तसेच वेबसाइटची गती वाढवून KYC प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
कर्जमाफी योजनेची वेबसाइट संथ; लाभार्थी शेतकरी संभ्रमात
Related Posts
Add A Comment

