छत्रपती संभाजीनगर :- महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासन (FDA) कडून भेसळयुक्त दूध, दुग्धजन्य पदार्थ, बेकरी उत्पादने, हॉटेल, मिठाई दुकाने आणि इतर खाद्यपदार्थांवर राज्यभर धडक कारवाई सुरू आहे. अनेक ठिकाणी छापे टाकून निकृष्ट दर्जाचे व भेसळयुक्त पदार्थ जप्त करण्यात आले असून, परवाने निलंबित करण्यासह कायदेशीर कारवाईही करण्यात येत आहे.
मात्र, नागरिकांमध्ये आता एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. खाद्यपदार्थांप्रमाणेच बंदी असलेल्या गुटखा, खर्रा, मावा आणि सुगंधी तंबाखूच्या अवैध विक्रीवरही तितक्याच कठोरपणे कारवाई होणार का?
अनेक शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात काही पानटपऱ्या, किराणा दुकाने तसेच घरातून लपूनछपून गुटखा विक्री सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. काही ठिकाणी खर्रा आणि मावा तयार करताना कोणते पाणी वापरले जाते, कोणते रसायन किंवा इतर पदार्थ मिसळले जातात, स्वच्छतेचे नियम पाळले जातात का, याची कोणतीही प्रभावी तपासणी होत नसल्याचीही चर्चा आहे.
नागरिकांची मागणी आहे की, FDA ने केवळ अन्नपदार्थांपुरतीच मोहीम मर्यादित न ठेवता पानटपऱ्या, तंबाखू विक्रेते आणि अवैध गुटखा पुरवठा साखळीचीही सखोल तपासणी करावी. स्थानिक पोलीस ठाण्यांनी आपल्या हद्दीतील अवैध गुटखा विक्री केंद्रांची माहिती गोळा करून संयुक्त कारवाई करावी, जेणेकरून युवकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या अवैध व्यवसायावर आळा बसेल.
जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात कोणतीही दया न दाखवता कठोर कारवाई करणे ही काळाची गरज आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थांवर जशी धडक मोहीम सुरू आहे, तशीच मोहीम अवैध गुटखा, खर्रा आणि मावा विक्रीविरोधातही राबविण्याची मागणी आता अधिक जोर धरत आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
FDA ची धडक मोहीम सुरू… आता गुटखा माफियांवर कधी कारवाई?
Related Posts
Add A Comment

