छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी छडा लावला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेली मोटारसायकल तसेच आणखी एक मोटारसायकल असा एकूण दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत.
चिकलठाणा पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हा क्र. 273/2026, कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अन्वये मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अभिजीत सुदर्शन गावंडे (वय 23 वर्षे, रा. गारखेडा नं. 1, छत्रपती संभाजीनगर) यास ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत आरोपीने अपातगाव येथून फिर्यादीची काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल, अंदाजे किंमत ₹90,000, चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीच्या ताब्यातून सदर चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली. तसेच आरोपीकडून अंदाजे ₹40,000 किंमतीची आणखी एक मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, या वाहनाबाबत पुढील तपास सुरू आहे.
सदर आरोपीला 24 जुलै 2026 रोजी अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत स्वामी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे, पोलीस हवालदार अनिल चव्हाण व पोलीस हवालदार गाडेकर यांनी केली.

