पैठण, दि. २४ जुलै : जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. २४ जुलै रोजी सकाळी ९ वाजता धरणात ५१ हजार ४४३ क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत होती.
उपलब्ध माहितीनुसार, जायकवाडी धरणाची पाणीपातळी ३२.८० टक्के असून धरणातील पाण्याची उंची १५०६.७५ फूट इतकी नोंदविण्यात आली आहे. पाण्याची आवक कायम राहिल्यास धरणातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

