छत्रपती संभाजीनगर, दि. २४ जुलै : स्वातंत्र्यलढ्यातील योगदानासोबतच शिक्षण, सामाजिक प्रबोधन आणि मराठवाड्याच्या शैक्षणिक विकासासाठी मोलाचे कार्य करणारे स्वातंत्र्यसेनानी पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
पैठण गेट येथील गोविंदभाई श्रॉफ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापौर समीर राजुरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गोविंदभाई श्रॉफ यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानून मराठवाड्यात शैक्षणिक चळवळीला दिशा दिली. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असून, शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे.
यावेळी स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, नगरसेवक सचिन खैरे, ऋषिकेश जैस्वाल, आयुक्त अमोल येडगे, सहायक आयुक्त रमेश मोरे, वॉर्ड अभियंता आरती नवगीरे, माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद, रविंद्र खरात, अतुल बनकर, संतोष कोठाळे, करण साळवे आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्य, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्य वेचणाऱ्या गोविंदभाई श्रॉफ यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांनी अभिवादन केले.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
शिक्षण क्षेत्राचे दीपस्तंभ स्वातंत्र्यसेनानी पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांना जयंतीनिमित्त अभिवादन
Related Posts
Add A Comment

