छत्रपती संभाजीनगर : मराठी भाषेच्या संवर्धनासाठी जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयांना सक्षम करण्यासोबतच ग्रंथालयांच्या मान्यता व वर्गबदलाच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन मराठी भाषा व उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात मराठी भाषेसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी श्री. गुलाबराव मगर व साईनाथ जाधव यांनी डॉ. सामंत यांना ग्रंथभेट देऊन स्वागत केले.
बैठकीदरम्यान ग्रंथालयांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. २०१२ पासून प्रलंबित असलेल्या ग्रंथालय मान्यता आणि वर्गबदलाच्या प्रश्नांकडे उपस्थितांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. याबाबतची सविस्तर माहिती असल्याचे सांगत डॉ. सामंत यांनी, सार्वजनिक ग्रंथालये अधिक सक्षम होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.
या प्रश्नांसाठी शिष्टमंडळासह मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन मागणी पुढे नेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन डॉ. सामंत यांनी दिले.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
मराठी भाषा संवर्धनासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन
Related Posts
Add A Comment

