छत्रपती संभाजीनगर, दि.२३ जुलै : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम गुरुवारी (दि.२३) घेण्यात आला.
मुख्य ईमारतीत आयोजित या कार्यक्रमात मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, अधिष्ठाता डॉ.भास्कर साठे, डॉ.सय्यद अझरुद्दीन, संचालक डॉ.कैलास अंभुरे, डॉ.सुभाष चव्हाण, डॉ.हिम्मत जाधव, डॉ.अश्विन रांजणीकर, डॉ.सोमीनाथ खाडे, उपकुलसचिव डॉ.गणेश मंझा, डॉ.संजय कवडे, डॉ.संजय शिंदे, माधव वागतकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

