पाचोड, ता. पैठण : महाराष्ट्र न्यूज टाइम्स (प्रतिनिधी)
बसमध्ये प्रवेश नाकारल्याने संतप्त झालेल्या शाळकरी विद्यार्थ्यांनी चक्क बससमोर आडवे होत आपला संताप व्यक्त केल्याची घटना पाचोड (ता. पैठण) येथील बसस्थानकावर घडली. या प्रकारामुळे काही काळ बसस्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पाचोडपासून सुमारे पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबड तालुक्यातील करडगाव व झोडेगाव येथील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी पाचोड येथे ये-जा करतात. दररोज अंबड-पैठण मार्गावरील एसटी बसने त्यांचा प्रवास सुरू असतो.
मात्र, पाचोड आगाराच्या इलेक्ट्रिक बसचालकाने करडगाव येथे अधिकृत बसथांबा नसल्याचे कारण सांगत विद्यार्थ्यांना बसमध्ये घेण्यास नकार दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यातच अंबड आगाराच्या बसनेही विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश न दिल्याने भर पावसात विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे सांगण्यात आले.
बसची नियमित सुविधा उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. संतप्त विद्यार्थ्यांनी बससमोर आडवे होत आपला निषेध नोंदविल्याने या प्रकाराची चर्चा परिसरात सुरू झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा प्रश्न लक्षात घेता एसटी महामंडळाने या समस्येची तातडीने दखल घेऊन संबंधित मार्गावर विद्यार्थ्यांना नियमित बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
बस थांबा नसल्याचे कारण देत विद्यार्थ्यांना बसमध्ये घेण्यास नकार; संतप्त विद्यार्थ्यांचा बससमोर ठिय्या
#ADCCBankElection #AnilBhaiyyaBorse #CooperativeElection #AurangabadDCCBank #ChhatrapatiSambhajinagar #MaharashtraNewsTime #ElectionNews #CooperativeSector #PoliticalNews #PoliceFamily #StudentFelicitation #SambhajinagarRuralPolice #EducationSuccess #MaharashtraNewsTime #SSCResult2026 #InspiringStudents
Related Posts
Add A Comment

