बदनापूर | एस के शेख (प्रतिनिधी)
शिक्षण, समाजसेवा, क्रीडा आणि जनकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे मा. डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर यांची “मराठवाडा भूषण सन्मान – २०२६” या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा मानाचा पुरस्कार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई – मराठवाडा विभाग, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे.
डॉ. पाथ्रीकर यांनी शिक्षण, सामाजिक बांधिलकी, प्रेरणादायी नेतृत्व, क्रीडा क्षेत्रातील योगदान तसेच विविध जनकल्याणकारी उपक्रमांद्वारे समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या बहुआयामी कार्याची दखल घेत हा प्रतिष्ठेचा सन्मान जाहीर करण्यात आला असून, या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हा सन्मान केवळ डॉ. पाथ्रीकर यांचाच नसून बदनापूर तालुका, जालना जिल्हा तसेच निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट परिवारासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
यापुढेही डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर यांचे क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक आणि जनकल्याणाचे कार्य अधिक जोमाने सुरू राहो, तसेच त्यांच्या कार्यातून समाजाला सातत्याने प्रेरणा मिळत राहो, अशा शुभेच्छा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर यांना ‘मराठवाडा भूषण सन्मान – २०२६’ जाहीर
Related Posts
Add A Comment

