छत्रपती संभाजीनगर | एस के शेख प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरहून इचलकरंजीकडे निघालेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसला शुक्रवारी सकाळी अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील ३८ प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले असून, सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ८ वाजता ही बस छत्रपती संभाजीनगर येथून इचलकरंजीकडे रवाना झाली होती. प्रवासादरम्यान बसच्या मागील भागातून धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. याचवेळी मागून प्रवास करणारे श्रीगोंदा येथील प्राचार्य अमोल नागवडे यांनी बसला आग लागल्याचे चालकाच्या निदर्शनास आणून दिले.
चालकाने तात्काळ प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि वाहकाच्या मदतीने सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले. काही क्षणांतच आगीने बसला वेढा घातला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले असून, बसचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, बसला आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास संबंधित विभागाकडून सुरू करण्यात आला आहे. चालकाच्या तत्परतेमुळे आणि वेळेवर मिळालेल्या इशाऱ्यामुळे ३८ प्रवाशांचे प्राण वाचल्याने सर्व स्तरांतून चालक व प्राचार्य अमोल नागवडे यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक करण्यात येत आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजीनगर–इचलकरंजी एसटी बसला भीषण आग; ३८ प्रवासी थोडक्यात बचावले
Related Posts
Add A Comment

