प्रिय वाचक, हितचिंतक आणि शिक्षणप्रेमींनो…
आपल्या सर्वांच्या प्रेम, विश्वास आणि सहकार्यामुळे “महाराष्ट्र न्यूज टाईम” या न्यूज पोर्टलची दखल गुगलने घेतली आहे. याबद्दल आम्ही सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार मानतो.
मात्र, माध्यम क्षेत्रात कार्य करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली—आज बहुतांश माध्यमांमध्ये नकारात्मक बातम्यांना अधिक प्रसिद्धी मिळते, तर समाजाला प्रेरणा देणाऱ्या सकारात्मक, शैक्षणिक, सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याला अपेक्षित स्थान मिळत नाही.
याच विचारातून समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी लक्षात घेऊन “ज्ञान सेतू” या शैक्षणिक डिजिटल दैनिकाची निर्मिती करण्यात आली आहे.
“ज्ञान सेतू” हे केवळ एक वृत्तपत्र नसून, ज्ञान, संस्कार, प्रेरणा आणि सकारात्मक विचारांना जोडणारा एक विश्वासार्ह मंच आहे. या डिजिटल दैनिकामध्ये शिक्षण क्षेत्रातील घडामोडी, शाळा-महाविद्यालयांचे उपक्रम, विद्यार्थी व शिक्षकांच्या यशोगाथा, विशेष मुलाखती, प्रेरणादायी लेख, सामाजिक व आध्यात्मिक विषय, स्पर्धा परीक्षा, करिअर मार्गदर्शन आणि समाजासाठी उपयुक्त माहिती प्रकाशित केली जाते.
हे दैनिक पूर्णपणे ऑनलाइन असल्यामुळे महाराष्ट्रासह देश-विदेशातील मराठी वाचकांपर्यंत सहज पोहोचत आहे. त्यामुळे ज्ञानाचा हा सेतू प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आपण स्वतः हे दैनिक नियमित वाचा आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य, विद्यार्थी, शिक्षक, पालक व मित्रपरिवारालाही वाचण्यासाठी प्रोत्साहित करा.
आपण उत्तम लेखन करत असाल, समाजोपयोगी उपक्रम राबवत असाल किंवा प्रेरणादायी कार्य करत असाल, तर “ज्ञान सेतू” मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे. आपल्या लेख, बातम्या आणि अनुभवांना आम्ही योग्य व्यासपीठ देण्यास सदैव तत्पर आहोत.
चला… सकारात्मक विचार, ज्ञान आणि संस्कारांचा प्रकाश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवूया!
धन्यवाद!
आपला,
दिनेश गायके
संस्थापक व संपादक
ज्ञान सेतू –
शैक्षणिक डिजिटल दैनिक
📞 मो.: 8275097161
🌐 वेबसाईट: https://www.dnyansetu.org
📧 ई-मेल: dnyansetuepaper@gmail.com


