छत्रपती संभाजीनगर दि. १६ जुलै (प्रतिनिधी)
छत्रपती संभाजीनगर शहराचे सौंदर्य, शिस्त आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स व बॅनर्स विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. शहरात विनापरवानगी उभारण्यात आलेल्या सर्व अनधिकृत होर्डिंग्ज तात्काळ हटविण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिले असून, संबंधितांनी शनिवार, दि. १८ जुलै पर्यंत स्वतःहून ही सर्व होर्डिंग्ज व बॅनर्स काढून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
महानगरपालिकेकडून शहरभर अनधिकृत जाहिरातीं विरोधात सातत्याने कारवाई सुरू असून, तरीही अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून होर्डिंग्ज व बॅनर्स उभारण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी संबंधित व्यक्ती, संस्था, संघटना व जाहिरातदारांना अंतिम इशारा देत मुदतीत अनधिकृत फलक हटविण्याचे आदेश दिले आहेत.
निर्धारित मुदती नंतरही अनधिकृत होर्डिंग्ज अथवा बॅनर्स आढळून आल्यास महानगरपालिकेच्या पथकांकडून ते तात्काळ हटविण्यात येतील. तसेच संबंधितांवर लागू कायदे व नियमांनुसार दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
शहराचे विद्रुपीकरण रोखणे, रस्ते व सार्वजनिक ठिकाणे अतिक्रमणमुक्त ठेवणे, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे, हा या विशेष मोहिमेचा उद्देश असल्याचे मनपा प्रशासनाने सांगितले आहे.
महानगरपालिकेने सर्व नागरिक, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, व्यापारी व जाहिरातदारांना नियमांचे पालन करून शहर सुशोभीकरणाच्या मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
शहरातील अनधिकृत होर्डिंग्जविरोधात मनपाचा दणका ,१८ जुलैपर्यंत स्वतःहून हटवा, अन्यथा कडक कारवाई
Related Posts
Add A Comment

