छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने सातारा परिसरातील गट क्रमांक ४ येथील नैसर्गिक नाल्यावर करण्यात आलेल्या अनधिकृत अतिक्रमणावर धडक कारवाई करत नाल्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत केला.
महापालिकेच्या माहितीनुसार, संबंधितांनी सिमेंटचे पाईप टाकून व कंपाऊंड उभारून नैसर्गिक नाला पूर्णपणे बुजवला होता. तसेच सुमारे १२०० मिमी क्षमतेच्या पाईपद्वारे नाल्याचा प्रवाह वळविण्यात आला होता. सुनावणीदरम्यान या बांधकामासाठी महानगरपालिकेची कोणतीही वैध परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले.
पावसाळ्यात या अतिक्रमणामुळे पाणी तुंबून पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अतिक्रमण निर्मूलन विभागाने जेसीबीच्या सहाय्याने नाल्यातील ६३ सिमेंट पाईप व कंपाऊंड जमीनदोस्त केले. त्यानंतर नाल्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करण्यात आला.
या प्रकरणी संबंधितांविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, कारवाईसाठी लागलेल्या यंत्रसामग्री व मनुष्यबळाचा खर्चही संबंधितांकडून वसूल करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.
महापालिकेने नागरिकांना नैसर्गिक नाले, गटारे आणि सार्वजनिक जागांवर अतिक्रमण न करण्याचे आवाहन केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
सातारा परिसरातील नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमणावर महापालिकेची बुलडोझर कारवाई
Related Posts
Add A Comment

