पैठण | प्रतिनिधी
आज झालेल्या मुसळधार पावसामुळे पैठण तालुक्यातील बिडकीन डीएमआयसी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक रस्ते जलमय झाल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली.
या पावसाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचे दृश्य त्यामध्ये दिसत आहे. काही ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला असून नागरिकांनीही आवश्यक असल्याशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
हवामान खात्याने पुढील काही तासांतही पावसाची शक्यता वर्तविल्याने नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षिततेची काळजी घ्यावी.

