पैठण | प्रतिनिधी
पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मा. डीवायएसपी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी ३.०० ते ६.०० या वेळेत व्यापक रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात आले.
या अभियानात एपीआय पवार, पीएसआय सारंग, एचसी चेडे, एचसी ढाकणे, पीसी शिंदे, पीसी दूबाळे, पीसी पठाण, पीसी भोजने व पीसी खिळे यांनी महेश चौक, सह्याद्री फाटा आणि गोलनाका येथे नागरिकांना वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी रस्ते अपघात कमी करणे, वाहतूक नियमांचे पालन वाढविणे आणि सुरक्षित वाहतुकीबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. नागरिकांना हेल्मेट व सीटबेल्टचा अनिवार्य वापर, मद्यपान करून वाहन न चालविणे, वेगमर्यादेचे पालन करणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे तसेच पादचारी व ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यास मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमाला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून सुरक्षित वाहतुकीसाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन पैठण पोलिसांनी केले.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
पैठण पोलिसांकडून रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान
Related Posts
Add A Comment

