छत्रपती संभाजीनगर 13 जुलै (प्रतिनिधी) माननीय आयुक्त, शहरी आरोग्य सेवा, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार आरोग्य सेवा परिमंडळ छत्रपती संभाजीनगर व लातूर यांच्या अधिपत्याखाली राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियाअंतर्गत महानगरपालिका, नगरपालिका स्तरावर आरोग्य संस्था व राज्य योजनेअंतर्गत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध आरोग्य विषयक उपक्रमांचा आढावा सोमवार, दि. १३ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता आयएमए हॉल, समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात आला.
या आढावा बैठकीस डॉ. सुनील भोकरे, आयुक्त, शहरी आरोग्य सेवा, मुंबई, डॉ. प्रसाद भंडारी, सहसंचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई तसेच डॉ. अमोल बाग, राज्य कार्यक्रम व्यवस्थापक, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, मुंबई यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीत छत्रपती संभाजीनगर व लातूर आरोग्य परिमंडळांतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, शहरी प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे, नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, विविध आरोग्य योजनांची प्रगती, गुणवत्ता आश्वासन, आर्थिक व्यवस्थापन तसेच आरोग्य संस्थांच्या कार्यक्षमतेबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आवश्यक सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.
सदरील बैठकीस छत्रपती संभाजीनगर व लातूर परिमंडळातील आरोग्य उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, माता-बाल संगोपन अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा लेखा व्यवस्थापक, शहर कार्यक्रम व्यवस्थापक, शहर लेखा व्यवस्थापक, शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक, जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक, पब्लिक हेल्थ मॅनेजर, CPHC कन्सल्टंट तसेच विविध कार्यक्रमांचे व्यवस्थापक उपस्थित होते.
सदर आढावा बैठकीचे यशस्वी आयोजन आरोग्य विभाग, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या वतीने करण्यात आले.

