Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

July 16, 2026

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026

‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

July 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»एका मोटारसायकल चोरीच्या धाग्याने उलगडले वाहनचोरीचे जाळे; ३३ चोरीच्या मोटारसायकली जप्त, ११ आरोपी जेरबंद
छत्रपती संभाजीनगर

एका मोटारसायकल चोरीच्या धाग्याने उलगडले वाहनचोरीचे जाळे; ३३ चोरीच्या मोटारसायकली जप्त, ११ आरोपी जेरबंद

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comJuly 13, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर | एस के शेख प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांविरोधात मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत तीन स्वतंत्र वाहनचोरीच्या टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे. सलग तपास मोहिमेत ३३ चोरीच्या मोटारसायकली जप्त, ११ आरोपींना अटक आणि सुमारे १६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांनी गुप्त माहिती, तांत्रिक तपास, सीसीटीएनएस प्रणाली, चेसिस व इंजिन क्रमांकांची शास्त्रोक्त पडताळणी आणि विविध पोलीस ठाण्यांतील गुन्हे अभिलेखांची सांगड घालत वाहनचोरीच्या संघटित रॅकेटचा पर्दाफाश केला.
विरगाव येथील चोरीपासून १९ गुन्ह्यांचा उलगडा
गाढेपिंपळगाव येथून चोरीस गेलेल्या एका होंडा शाईन मोटारसायकलच्या तपासातून पोलिसांनी आरोपी महेश उत्तम गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत साहील राजेश चव्हाण याच्या मदतीने विविध भागांतून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली मिळाली.
आरोपींनी शेतातील झुडपांमध्ये लपवून ठेवलेल्या मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या. विशेष म्हणजे अनेक वाहनांचे चेसिस आणि इंजिन क्रमांक घासून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सर्व वाहनांची ओळख पटवली.
या कारवाईत १९ मोटारसायकली (होंडा शाईन, बजाज पल्सर, प्लॅटिना, हिरो HF डिलक्स, पॅशन प्रो, टीव्हीएस व्हिक्टर, सीबीझेड आदी) जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत ८.३५ लाख रुपये आहे. या तपासातून विरगाव, वैजापूर, सिल्लोड, चिकलठाणा, पैठण, शिवूर, देवगाव रंगारी, छावणी, सातारा तसेच श्रीरामपूर परिसरातील वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले.
चिकलठाणा पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
चिकलठाणा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शेख रेहान खान अमजद खान याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत शेख सद्दाम शेख मकसूद आणि शेख अमेर शेख रफिक यांचा सहभाग समोर आला.
या तिघांकडून ८ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. यामध्ये हिरो HF डिलक्स, होंडा युनिकॉन, होंडा ॲक्टिव्हा आणि होंडा शाईन या वाहनांचा समावेश असून जप्त वाहनांची किंमत ३.१५ लाख रुपये आहे. या टोळीने चिकलठाणा, सिल्लोड, सोयगाव, सिटी चौक, सिडको, सातारा आणि वेदांतनगर परिसरात वाहनचोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
एमआयडीसी पैठणमध्ये सात आरोपींची टोळी जेरबंद
एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्याच्या तपासात ७ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ६ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. जप्त वाहनांमध्ये हिरो स्प्लेंडर, बजाज प्लॅटिना, बजाज पल्सर आणि रॉयल एनफिल्ड बुलेटचा समावेश असून त्यांची अंदाजे किंमत ३ लाख रुपये आहे.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी सांगितले की, वाहनचोरीच्या प्रत्येक गुन्ह्याचा तपास केवळ चोरीचे वाहन शोधण्यापुरता मर्यादित न ठेवता त्यामागील संपूर्ण गुन्हेगारी साखळी उघड करणे, आरोपींवर कठोर कारवाई करणे आणि अशा गुन्ह्यांना प्रतिबंध घालणे ही छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची ठाम भूमिका आहे. या कारवाईत अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून वाहनचोरीविरोधातील मोहीम यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

July 16, 2026

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026

‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

July 16, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

By Maharashtranewstimes2026@gmail.comJuly 16, 20260
Spread the love

छत्रपती संभाजीनगर, दि.१५(प्रतिनिधी)- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ‘इंडिया स्किल्स…

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

July 16, 2026

‘माय भारत’ पोर्टलवर युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

July 16, 2026

अमृत-सक्षम’ उपक्रमाद्वारे कचरा व्यवस्थापनात उद्योजक होण्याची सुवर्णसंधी

July 16, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.