छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी NDPS Act अंतर्गत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले २६० किलो ७९८ ग्रॅम अंमली पदार्थ न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नष्ट केले.
पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशानुसार राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत केंद्रीय गोदाम तसेच बेगमपुरा, सिटीचौक, एमआयडीसी सिडको, एमआयडीसी वाळूज, दौलताबाद, जिन्सी, छावणी, सातारा आणि हर्सूल पोलीस ठाण्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचा समावेश होता. न्यायालयाची परवानगी, पंचनामा आणि न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार अंमली पदार्थांचा नाश करण्यात आला.
नष्ट करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये २६० किलो ११३ ग्रॅम गांजा, २१ ग्रॅम १५ मिलीग्रॅम एमडी (मेफेड्रोन) पावडर आणि ६०४ ग्रॅम ६० मिलीग्रॅम चरस यांचा समावेश असून, त्याची अंदाजे बाजार किंमत ३७ लाख ६२ हजार ६४४ रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हा संपूर्ण मुद्देमाल शासनमान्य Maharashtra Enviro Power Ltd., MIDC रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे येथे सुरक्षित पद्धतीने नष्ट करण्यात आला.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-१) पंकज अतुलकर, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मजहर सय्यद तसेच गुन्हे शाखा, अंमली पदार्थ प्रतिबंधक विभाग आणि संबंधित पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली.
अंमली पदार्थांच्या तस्करी व गैरव्यवहाराविरुद्ध छत्रपती संभाजीनगर पोलीस सातत्याने कठोर कारवाई करत असून, अशा कारवायांमुळे शहरात अमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करण्यास मोठी मदत होत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून तब्बल ३७.६२ लाखांच्या अंमली पदार्थांचा नाश
Related Posts
Add A Comment

