छत्रपती संभाजीनगर | एस के शेख प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर शहरातील १९९० च्या दशकात दहशत निर्माण करणारा कथित डॉन बाबा फरजान याच्या पडेगाव येथील आलिशान बंगल्यावर गुन्हे शाखेने शनिवारी पहाटे मोठी धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात रोकड, सोने-चांदी तसेच शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केला असून शहरातील गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगल्यातून सुमारे ५.५० कोटी रुपयांची रोकड, अंदाजे २१ लाख रुपयांचे सोने, ८ लाख रुपयांची चांदी तसेच चार रायफल, तब्बल ६३५ जिवंत काडतुसे, तलवारी आणि अन्य घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि रोकड आढळल्याने तपास यंत्रणांनी या संपत्तीचा स्रोत, शस्त्रांचा वापर आणि संभाव्य गुन्हेगारी संबंधांचा तपास सुरू केला आहे.
या प्रकरणात संबंधित आरोपीला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी (PCR) सुनावली असून छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विवेक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या रोकड व मालमत्तेचा संबंध हवाला, खंडणी, बेकायदेशीर व्यवहार किंवा इतर संघटित गुन्हेगारीशी आहे का, याचाही तपास केला जात आहे.
या धाडीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पहाटे सुरू झालेल्या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र न्यूज टाइम्स
संपादक दिनेश गायके
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजीनगरात ९०च्या दशकातील कुख्यात डॉनच्या बंगल्यावर धाड; कोट्यवधींची रोकड, सोन्या-चांदीसह शस्त्रसाठा जप्त
Related Posts
Add A Comment

