किनगाव | एस के शेख प्रतिनिधी
जिल्हा परिषदेची शाळा आणि न्यू हायस्कूल, किनगाव येथे भेट देत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अभ्यासाची पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह, जिज्ञासा आणि शिक्षणाविषयीची आवड पाहून त्यांना स्वतःच्या शालेय जीवनाच्या आठवणी जाग्या झाल्याचे त्यांनी सांगितले.
आदर्श गावातील शाळाही आदर्श असावी आणि येथील विद्यार्थी जागतिक स्तरावर आपले कर्तृत्व सिद्ध करणारे घडावेत, या उद्देशाने सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना पुरस्कारप्राप्त आणि जागतिक दर्जाची जालिंदर नगर शाळा दाखविण्यात आली होती. तेथील आदरणीय श्री. वारे गुरुजी यांच्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीचा अवलंब स्थानिक शाळांमध्ये व्हावा, यासाठी प्रशिक्षण पुस्तिका तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी दिली.
विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेताना त्यांच्यातील आत्मविश्वास आणि शिकण्याची जिद्द जाणवल्याचे चव्हाण यांनी सांगितले. अशा संवादातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी आपल्या बालपणीच्या शिक्षणप्रवासाच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, साधनसामग्रीचा अभाव असतानाही मोठ्या भावांच्या सहकार्याने अनेक मैल पायी आणि कधी सायकलवर प्रवास करून शिक्षण पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. आज विद्यार्थ्यांना अधिक सुविधा उपलब्ध असल्या तरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) युगातील नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांना सक्षम बनविणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“विद्यार्थी ज्ञान, कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर भविष्यातील स्पर्धेत यशस्वी ठरावेत, यासाठी शिक्षणात सातत्याने नावीन्य आणण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असेही अतुल चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
‘त्या’ चिमुकल्यांचा अभ्यास घेताना, माझ्या शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या! – अतुल चव्हाण
Related Posts
Add A Comment

