छत्रपती संभाजीनगर, दि. 10 जुलै:(एस के शेख प्रतिनिधी)
अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी महत्त्वपूर्ण कारवाई करत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल 906.63 किलो गांजा सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट केला आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या अवैध साखळीवर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे.
सन 2023 ते 2026 या कालावधीत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये गांज्याची झाडे व सुका गांजा असा एकूण 906.63 किलो मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. हा मुद्देमाल पोलीस मुख्यालयातील मध्यवर्ती गोडाऊनमध्ये सुरक्षित ठेवण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या अध्यक्षतेखालील अंमली पदार्थ नाश समितीने सर्व प्रकरणांचा आढावा घेतल्यानंतर रासायनिक विश्लेषण (सी.ए.) अहवाल, न्यायालयाची परवानगी आणि इतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अंमली पदार्थ नष्ट करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार 8 जुलै 2026 रोजी हा गांजा महाराष्ट्र एन्व्हीरो पॉवर लिमिटेड, एमआयडीसी, रांजणगाव (ता. शिरूर, जि. पुणे) येथे सुरक्षितरीत्या पाठवून पर्यावरणीय व कायदेशीर निकषांचे पालन करत अंतिमतः नष्ट करण्यात आला.
या कारवाईवेळी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी, प्रभारी पोलीस उपअधीक्षक संजय सहाणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, तसेच प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे अधिकारी आणि तज्ज्ञ उपस्थित होते.
नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थांमध्ये वैजापूर, करमाड, पिशोर, शिवूर, फुलंब्री, सिल्लोड ग्रामीण आणि बिडकीन पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांतील जप्त मुद्देमालाचा समावेश होता.
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी तसेच जप्त मुद्देमालाची पारदर्शक आणि कायदेशीर विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविल्याचे सांगितले. समाजाला व्यसनमुक्त आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही सुरू राहतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस उपअधीक्षक संजय सहाणे, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत तसेच पोलीस अंमलदार संगीता वासडीकर, रवी लोखंडे, सचिन सोनार, प्रिया भंडारे आणि सरला जाधव यांनी यशस्वीपणे पार पाडली.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; 906.63 किलो गांजा कायदेशीर प्रक्रियेनंतर नष्ट
Related Posts
Add A Comment

