छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : गोर बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी येत्या १२ जुलै २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय सकल गोर बंजारा एसटी आरक्षण महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात राज्यभरातील गोर बंजारा समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी, समाजबांधव आणि मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती गोर सेनेच्या प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे.
प्रसिद्धीपत्रकानुसार, गोर बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी यापूर्वी विविध स्तरांवर आंदोलने, निवेदने आणि पाठपुरावा करण्यात आला आहे. या प्रश्नावर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, तसेच समाजाच्या मागणीला न्याय मिळावा, यासाठी हा महामेळावा आयोजित करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांनी समाजबांधवांना आवाहन करताना, “संभाजीनगरच्या सकल गोरवंजारा समाजाने एसटीचे आरक्षण मिळवण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे,” असे म्हटले आहे.
गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष नितेश उत्तम राठोड यांनीही जिल्ह्यातील सर्व समाजबांधव, युवक, महिला आणि विविध सामाजिक संघटनांनी या महामेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाजाची एकजूट दाखवावी, असे आवाहन केले आहे.
महामेळावा रविवार, १२ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता, मंथन हॉल, एमआयटी महाविद्यालय परिसर, बीड बायपास रोड, छत्रपती संभाजीनगर येथे होणार असल्याची माहितीही आयोजकांनी दिली आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजीनगरात १२ जुलै रोजी गोर बंजारा समाजाचा एसटी आरक्षण महामेळावा; मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
Related Posts
Add A Comment

