छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या कर वसुली मोहिमेला नागरिकांकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार गुरुवार, दि. ९ जुलै २०२६ रोजी शहरातील सर्व १० झोनमध्ये विशेष कर वसुली मोहीम राबविण्यात आली. सलग चौथ्या आठवड्यात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकाच दिवशी १३ थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या, तर ३९.३५ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला.
आयुक्तांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे आणि उपआयुक्त विकास नवाळे यांनी प्रत्येक झोनसाठी १५ ते २० मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करून कर वसुली पथकांना कार्यवाहीचे आदेश दिले होते. त्यानुसार दिवसभर विविध झोनमध्ये थकबाकीदारांवर कारवाई करण्यात आली.
झोननिहाय कारवाई पुढीलप्रमाणे :
झोन ३ : १ मालमत्ता सील
झोन ५ : २ मालमत्ता सील, १५.७७ लाख रुपये कर वसूल
झोन ६ : २ मालमत्ता सील, ७.०८ लाख रुपये कर वसूल
झोन ७ : २.०० लाख रुपये कर वसूल
झोन ९ : २ मालमत्ता सील
झोन १० : ६ मालमत्ता सील, १४.५० लाख रुपये कर वसूल
या विशेष मोहिमेत एकूण १३ मालमत्ता सील करण्यात आल्या असून ३९.३५ लाख रुपयांची कर वसुली करण्यात आली. कर थकबाकीदारांनी पुढील कारवाई टाळण्यासाठी तातडीने थकीत मालमत्ता कर भरावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
महानगरपालिकेची कर वसुली मोहीम; सलग चौथ्या आठवड्यात एकाच दिवशी १३ मालमत्ता सील, ३९.३५ लाखांचा कर वसूल
Related Posts
Add A Comment

