सोयगाव | प्रतिनिधी : सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव-निंभोरा शिवारात सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग व सोयगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणात अवैध दारू निर्मितीचे साहित्य नष्ट केले.
या कारवाईदरम्यान ८५० लिटर रसायन (अंदाजे किंमत २९,७५० रुपये), ३० लिटर गावठी हातभट्टी दारू (किंमत ३,००० रुपये) तसेच दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ४४,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला.
या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, संबंधित गुन्ह्यांची नोंद राज्य उत्पादन शुल्क विभाग, सिल्लोड येथे करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभाग व सोयगाव पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईमुळे अवैध गावठी दारू निर्मितीला आळा बसण्यास मदत होणार असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायाविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
गोंदेगाव-निंभोरा शिवारात गावठी हातभट्टीवर धाड; ४४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट
Related Posts
Add A Comment

