छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या गरवारे कम्युनिटी सेंटरतर्फे विविध नियमित उपक्रम वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कला, सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारे विविध अभ्यासक्रम यंदाही उपलब्ध करण्यात आले असून पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
यामध्ये अभिरुची वर्ग (वयोगट ४ ते ५.५ वर्षे), हस्ताक्षर सुधारणा वर्ग (इयत्ता ३ री ते ९ वी), फिल्मी डान्स वर्ग (वयोगट ६ ते १४ वर्षे) तसेच चित्रकला वर्ग (वयोगट ६ ते १४ वर्षे) अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रत्येक उपक्रमासाठी तीन महिन्यांचे प्रवेश शुल्क ₹१००० निश्चित करण्यात आले आहे. मर्यादित प्रवेश असल्याने इच्छुक पालकांनी लवकरात लवकर प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
हे वर्ग गरवारे कम्युनिटी सेंटर, एन-७, सिडको, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात येणार असून अधिक माहितीसाठी ०२४०-२९९४७९३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

