छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता आक्रमक भूमिका घेतली असून, “कोणत्याही परिस्थितीत उद्या सकाळी ११ ते १२ वाजेच्या दरम्यान पंपिंग सुरू झालीच पाहिजे,” असे स्पष्ट आणि कडक निर्देश महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित एजन्सी व अधिकाऱ्यांना दिले.
स्मार्ट सिटी कार्यालयात गुरुवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पाणीपुरवठा योजना, बंद असलेली पंपिंग व्यवस्था आणि जॅकवेल देखभाल कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी कामातील विलंबाबाबत आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित एजन्सीला फटकारले.
बैठकीत आयुक्तांनी आजच संध्याकाळी एजन्सी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि महापालिकेच्या अभियंत्यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले. रात्रीच नवीन व्हॉल्व बदलण्याचे नियोजन करून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा शुक्रवारी सूर्योदय होताच काम सुरू करून दुपारी १२ वाजण्यापूर्वी पंपिंग सुरू करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एजन्सीच्या प्रतिनिधींनी कामातील विलंबाची कारणे मांडण्याचा प्रयत्न केल्यावर आयुक्तांनी, “तुमची डेडलाईन आधीच संपली आहे. आता कोणतीही सबब चालणार नाही. आधी काम पूर्ण करा,” अशा शब्दांत सुनावले. तसेच एप्रोच चॅनेलचे कामही तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
बैठकीत नवीन व्हॉल्वच्या पुरवठ्यावर सतत लक्ष ठेवणे, खराब व्हॉल्वची जबाबदारी संबंधित एजन्सीवर निश्चित करणे आणि नवीन व्हॉल्व आल्यानंतर पाच दिवसांच्या आत बदलण्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. आवश्यकतेनुसार नियोजित शटडाऊन घेऊन काम पूर्ण केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले.
या बैठकीस विशेष कार्यकारी अधिकारी ए. बी. देशमुख, के. एम. फालक, अतिरिक्त शहर अभियंता अनिल तनपुरे, कार्यकारी अभियंता सचिन वाईकर, कनिष्ठ अभियंते, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार रामधन जाधव, योगेश काळे, जीव्हीपीआरचे सिद्धांत ठाकरे, आशुतोष पांडेय तसेच एमजेपीचे राम नारायण यांच्यासह संबंधित अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
उद्यापर्यंत पंपिंग सुरूच झाली पाहिजे; आयुक्त अमोल येडगे यांचे कडक आदेश
Related Posts
Add A Comment

