किनगाव,6 जुलै (एस के शेख प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पशुवैद्यकीय चिकित्सालय, किनगाव येथे आज उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. परिसर अधिक हिरवागार करण्याच्या उद्देशाने विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला डॉ. सिद्दीकी, डॉ. सुरेश मुळीक, श्री. साईनाथ सांगळे, पशुपालक श्री. सचिन चव्हाण तसेच न्यू हायस्कूल, किनगाव येथील शिक्षकवृंद उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
यावेळी नारळ, बदाम आदी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. लावलेली झाडे केवळ लावून न थांबता त्यांचे संगोपन करून ती जगविण्याचा संकल्पही उपस्थितांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश देत पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
पशुवैद्यकीय चिकित्सालय किनगाव येथे वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश
Related Posts
Add A Comment

