छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची ओळख नागरिकांना करून देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि इंटॅक (INTACH), छत्रपती संभाजीनगर चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘धावणी मोहल्ला हेरिटेज वॉक’ चे आयोजन रविवार, ५ जुलै २०२६ रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत करण्यात आले आहे.
या हेरिटेज वॉकची सुरुवात शहागंज येथील गांधी पुतळा येथून होऊन पानदरिबा येथील अप्पा हलवाई येथे समारोप होणार आहे. या वॉकमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांना धावणी मोहल्ला, शहागंज, सराफा आणि पानदरिबा परिसरातील ऐतिहासिक वास्तू, धार्मिक स्थळे आणि सांस्कृतिक वारशाची माहिती तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे.
यंदाचे आयोजन महात्मा गांधी यांच्या पुण्यस्मरण वर्षानिमित्त तसेच भाई दयासिंह यांच्या ३६५ व्या जयंती वर्षानिमित्त विशेष स्वरूपात करण्यात आले आहे. या हेरिटेज वॉकमध्ये शहरातील प्राचीन विठ्ठल मंदिर, उदासी आखाडा, भाई दयासिंहजी गुरुद्वारा तसेच परिसरातील अनेक ऐतिहासिक स्थळांची माहिती सहभागी नागरिकांना प्रत्यक्ष भेटीद्वारे अनुभवता येणार आहे.
इतिहासप्रेमी, विद्यार्थी, संशोधक, पर्यटक तसेच शहराच्या सांस्कृतिक वारशाबद्दल जाणून घेण्याची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी ही हेरिटेज वॉक एक उत्तम संधी ठरणार आहे. शहराचा समृद्ध इतिहास जतन करण्यासोबतच वारसा संवर्धनाबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या शहराचा ऐतिहासिक वारसा जाणून घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संपर्क : ९७६५७५४३८० / ९४२०७५९४५५
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
धावणी मोहल्ला हेरिटेज वॉकद्वारे शहराच्या समृद्ध इतिहासाचा अनोखा वारसा उलगडणार
Related Posts
Add A Comment

