छत्रपती संभाजीनगर दि.०३ जुलै (शहर प्रतिनिधी)छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी राबविण्यात येतो.
माहे जुलै २०२६ चा महानगरपालिका लोकशाही दिन सोमवार दि.०६ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता प्रशासकीय समिती कक्ष ,मनपा मुख्यालय येथे मां.आयुक्त यांचे अध्यक्षते खाली आयोजीत करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिलेल्या सुधारित परिपत्रकानुसार लोकशाही दिनाच्या १५ दिवस अगोदर विहित नमुन्यात आवश्यक कागद पत्रासह अर्ज दिलेल्या नागरिकांनाच दि.०६ जुलै २०२६ रोजी समक्ष अर्ज सादर करण्याची परवानगी राहील ,याची नोंद घ्यावी.
ज्यांनी या पूर्वीच्या महानगरपालिका लोकशाही दिनात तक्रार अर्ज दिलेले असतील परंतु त्याच प्रकरणात अद्याप कार्यवाही झाली नाही अशा प्रकरणात त्यांनी पुन्हा अर्ज देण्याची आवश्यकता नाही असे अतिरिक्त आयुक्त ०२ कल्पिता पिंपळे छत्रपती संभाजीनगर पालिका यांनी कळविले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
०६ जुलै रोजी महानगरपालिका लोकशाही दिन
Related Posts
Add A Comment

