Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

“ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक घरात… सकारात्मक पत्रकारितेचा नवा अध्याय – ‘ज्ञान सेतू'”

July 17, 2026

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात कंत्राटी पदभरतीला विभागीय आयुक्तांची मंजुरी

July 17, 2026

स्पिक मॅके’च्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

July 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»“पहिले समजावले… नंतर कारवाई! रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर आयुक्तांचा धडक ॲक्शन” जनजागृती, शिस्त आणि दंडात्मक कारवाईतून स्वच्छ छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने आणखी एक ठोस पाऊल!
छत्रपती संभाजीनगर

“पहिले समजावले… नंतर कारवाई! रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर आयुक्तांचा धडक ॲक्शन” जनजागृती, शिस्त आणि दंडात्मक कारवाईतून स्वच्छ छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने आणखी एक ठोस पाऊल!

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comJuly 3, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर, : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे मा. आयुक्त श्री. अमोल येडगे यांनी सकाळी नियमित जॉगिंगदरम्यान शहरातील स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनाची अचानक पाहणी केली. पाहणीदरम्यान रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकास त्यांनी प्रथम कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व समजावून सांगितले. घरातील कचरा ओला, सुका, घरगुती घातक आणि सॅनिटरी अशा चार प्रकारांत वर्गीकरण करूनच महानगरपालिकेच्या घंटागाडीत द्यावा, असे आवाहन त्यांनी संबंधित नागरिकास केले.
त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याप्रकरणी मा. आयुक्त यांच्या आदेशान्वये संबंधित नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. झोन क्र. ५ पथकाने ‘क्लीन स्ट्रीट ॲप’ द्वारे ब्रिजवाडी चौक ते उत्तरानगरी, एमआयडीसी चिकलठाणा परिसरात कारवाई करून ₹३,००० दंड वसूल केला.
पाहणीदरम्यान एक कर्मचारी धूम्रपान करताना आढळून आला. सार्वजनिक सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांनी कामाच्या वेळेत अथवा इतर कोणत्याही वेळी धूम्रपान करू नये, अशी समज देत संबंधित कर्मचाऱ्यास सुधारणा करण्याच्या उद्देशाने नोटीस बजावण्यात आली.
यावेळी मा. आयुक्तांनी शहरातील स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, घंटागाड्यांमधील वर्गीकृत कचऱ्याचे संकलन तसेच स्वच्छता व्यवस्थेची सविस्तर पाहणी केली. संबंधित अधिकारी, कर्मचारी, आयईसी (IEC) टीम आणि घंटागाडी कर्मचाऱ्यांना नागरिकांना अधिक दर्जेदार स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी जनजागृती, शंभर टक्के कचरा संकलन आणि शंभर टक्के कचरा वर्गीकरण सुनिश्चित करण्याबाबत आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका नागरिकांना आवाहन करते की, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये. घरातील कचरा चार प्रकारांत वर्गीकृत करूनच घंटागाडीत द्यावा आणि ‘स्वच्छ, सुंदर, हरित छत्रपती संभाजीनगर’ घडविण्याच्या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा.

https://maharashtranewstimes.in/wp-content/uploads/2026/07/VID-20260703-WA0231.mp4

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

“ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक घरात… सकारात्मक पत्रकारितेचा नवा अध्याय – ‘ज्ञान सेतू'”

July 17, 2026

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात कंत्राटी पदभरतीला विभागीय आयुक्तांची मंजुरी

July 17, 2026

स्पिक मॅके’च्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

July 17, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

“ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक घरात… सकारात्मक पत्रकारितेचा नवा अध्याय – ‘ज्ञान सेतू'”

By Maharashtranewstimes2026@gmail.comJuly 17, 20260
Spread the love

प्रिय वाचक, हितचिंतक आणि शिक्षणप्रेमींनो… आपल्या सर्वांच्या प्रेम, विश्वास आणि सहकार्यामुळे “महाराष्ट्र न्यूज टाईम” या…

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात कंत्राटी पदभरतीला विभागीय आयुक्तांची मंजुरी

July 17, 2026

स्पिक मॅके’च्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

July 17, 2026

दिलखुलास’मध्ये पंढरपूर वारीच्या यशस्वी प्रशासकीय व्यवस्थापनाचा वेध यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे यांची विशेष मुलाखत

July 17, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.