छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
शहरातील नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न मिळावे या उद्देशाने अन्न व औषध प्रशासनाने (FDA) शहरात विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत गुरुवारी (दि. २ जुलै २०२६) पैठण गेट परिसरातील मे लकी ज्युस सेंटर येथे धडक कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्याने मुदतबाह्य अन्नसाठा नष्ट करण्यात आला असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती वर्षा रोडे यांनी अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर, फरीद सिद्दीकी आणि कीर्तिका झाडे यांच्या पथकासह संबंधित आस्थापनाची तपासणी केली. यावेळी पास्चुराइज्ड होमोजनाइज्ड टोनड दूध आणि अल्फान्सो मॅंगो पल्प यांचा मुदतबाह्य साठा ज्यूस तयार करण्यासाठी वापरला जात असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा साठा तात्काळ नष्ट करण्यात आला.
तपासणीदरम्यान आईस्क्रीमऐवजी फ्रोजन डेजर्टचा वापर होत असल्याचेही आढळले. तसेच आस्थापनात स्वच्छतेचा अभाव असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित अन्नव्यवसायिकांना स्वच्छता व अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
याच मोहिमेअंतर्गत पैठण गेट परिसरातील मे फ्रेश ज्युस सेंटर आणि न्यू लकी ज्युस सेंटर येथेही तपासणी करण्यात आली. या आस्थापनांनाही स्वच्छता राखणे, दर्जेदार अन्नपदार्थांचा वापर करणे आणि अन्न सुरक्षा कायद्याचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
ही कारवाई मा. सहआयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या आदेशानुसार आणि सहायक आयुक्त दयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासणी अहवालाच्या आधारे संबंधितांवर आवश्यक ती पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शहरभर तपासणी मोहीम सुरू
अन्न व औषध प्रशासनाकडून केवळ एक-दोन आस्थापनांपुरती मर्यादित कारवाई न करता शहरातील विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, खानावळी, बेकरी, ज्यूस सेंटर आणि इतर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची नियमित तपासणी केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये यासाठी स्वच्छता, अन्नपदार्थांचा दर्जा, मुदतबाह्य साठा आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन यावर विशेष भर दिला जात आहे.
FDA चे आवाहन
अन्न व्यवसायिकांनी स्वच्छता राखावी, मुदतबाह्य अन्नपदार्थांचा वापर टाळावा, अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. तसेच नागरिकांनीही संशयास्पद किंवा निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांची माहिती प्रशासनाला देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
FDA ची छत्रपती संभाजीनगरात धडक मोहीम; मुदतबाह्य अन्नसाठा जप्त, अनेक हॉटेल्स व ज्यूस सेंटरची तपासणी
Related Posts
Add A Comment

