वैजापूर | प्रतिनिधी
वैजापूर शहरातील बोथरा पेट्रोल पंपाजवळील एका टपरीत सुरू असलेल्या चक्री जुगार अड्ड्यावर वैजापूर पोलिसांनी छापा टाकून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैध धंद्यांविरोधातील कारवाईदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने १ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ६.१५ वाजता बोथरा पेट्रोल पंपाजवळील ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी शुभम रावसाहेब जाधव (वय ३०, रा. इंगळे गल्ली, वैजापूर) हा लोकांकडून पैसे घेऊन ‘चक्री’ नावाचा जुगार खेळविताना आढळून आला.
कारवाईदरम्यान आरोपीकडून रोख १,१२३ रुपये, एक एलईडी टीव्ही (अंदाजे किंमत २० हजार रुपये), एक स्मार्ट मोबाईल (अंदाजे किंमत १५ हजार रुपये) तसेच चक्की जुगाराचे साहित्य असा एकूण ३६,१२३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलिस अंमलदार अमोल कांबळे यांच्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वैजापूर पोलीस करीत आहेत.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
वैजापूरात चक्री जुगारावर पोलिसांची धाड; रोख रक्कम व साहित्य जप्त, एकावर गुन्हा दाखल
Related Posts
Add A Comment

