छत्रपती संभाजीनगर (एस के शेख प्रतिनिधी): नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने धडक कारवाई सुरू ठेवली आहे. त्याअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरातील ‘हॉटेल आईच्या गावात’ आणि ‘यल्ला यल्ला रेस्टॉरंट’ येथे छापा टाकून अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन झाल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.
तपासणीदरम्यान स्वच्छतेचा अभाव, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक, कालबाह्य अथवा संशयास्पद खाद्यपदार्थ, तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 आणि संबंधित नियमांचे उल्लंघन आढळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यावेळी संबंधित आस्थापनांमधून अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आले असून ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
FDA अधिकाऱ्यांनी संबंधित हॉटेल व्यवस्थापनाला आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना देत कायदेशीर नोटीस बजावली आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार पुढील दंडात्मक अथवा कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित अन्न मिळावे यासाठी शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी व इतर खाद्य व्यावसायिकांची तपासणी नियमितपणे सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच अन्नाच्या गुणवत्तेबाबत किंवा स्वच्छतेबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी FDA कडे माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
महाराष्ट्र न्यूज टाईम
संपादक – दिनेश गायके
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजीनगरात अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई; ‘हॉटेल आईच्या गावात’ व ‘यल्ला यल्ला रेस्टॉरंट’वर छापा
Related Posts
Add A Comment

