छत्रपती संभाजीनगर, दि. २९ : शहरासह जिल्ह्यात आज वटपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच विवाहित महिलांनी पारंपरिक साज-शृंगार करून वटपौर्णिमेचा निर्जळी उपवास पाळला. नव्या साड्या, दागिने, हिरव्या बांगड्या, मंगळसूत्र आणि फुलांच्या गजऱ्यांनी सजलेल्या महिलांनी मंदिरे व वडाच्या झाडाजवळ मोठी गर्दी केली.
यावेळी महिलांनी वडाच्या झाडाची विधिवत पूजा करून त्याला दोरा गुंडाळत अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य, कुटुंबाचे सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. अनेक ठिकाणी सामूहिक वटपूजनाचे आयोजन करण्यात आले होते. पूजा संपल्यानंतर महिलांनी वटपौर्णिमेची कथा श्रवण करून पारंपरिक विधी पूर्ण केले.
वटपौर्णिमेनिमित्त शहरातील मंदिरे आणि वडाच्या झाडांच्या परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महिला एकमेकींना शुभेच्छा देत हा सण आनंदात साजरा करताना दिसल्या. परंपरा, श्रद्धा आणि संस्कृतीचे जतन करणारा हा सण महिलांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
वटपौर्णिमा उत्साहात साजरी; साज-शृंगार, उपवास आणि वडपूजनाने महिलांनी मागितले अखंड सौभाग्य
Related Posts
Add A Comment

