वेरूळ (छत्रपती संभाजीनगर), दि. २९ : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री घृष्णेश्वर महादेव मंदिरात जाऊन विधिवत दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भगवान महादेवाची पूजा-अर्चा करून राज्यातील जनतेच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि शांतीसाठी प्रार्थना केली.
दर्शनानंतर मंदिर परिसरात उपस्थित भाविकांशी त्यांनी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच राज्यात चांगला पाऊस पडावा, शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद व भरभराट यावी आणि सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुखकर व्हावे, अशी प्रार्थना त्यांनी भगवान घृष्णेश्वर चरणी अर्पण केली.
यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने आमदार रोहित पवार यांचा पारंपरिक पद्धतीने सत्कार करण्यात आला. त्यांच्या भेटीदरम्यान मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती. अनेकांनी त्यांची भेट घेऊन संवाद साधला तसेच छायाचित्रेही काढली.
बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिराला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असून, देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. आमदार रोहित पवार यांच्या या भेटीमुळे मंदिर परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले.
महाराष्ट्र न्यूज टाइम्स
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
आमदार रोहित पवार यांनी घेतले बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन; राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी घातले साकडे
Related Posts
Add A Comment

