छत्रपती संभाजीनगर, दि. 29 जून : राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने आज (सोमवार) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. आंदोलनात जिल्ह्यातील ग्रंथालय चालक, कर्मचारी, वाचनप्रेमी आणि सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संघटनेने शासनाकडे राज्यातील ११,१५५ मान्यताप्राप्त सार्वजनिक ग्रंथालयांना जाहीर केलेली 40 टक्के अनुदानवाढ तातडीने लागू करणे, ग्रंथालयांचे वर्ग बदलास मान्यता देणे, 2,000 नवीन सार्वजनिक ग्रंथालयांना शासन मान्यता देणे, ग्रंथालयांच्या अनुदानात तीनपट वाढ करणे तसेच ग्रंथालय कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करणे या प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.
“ग्रंथालय वाचवा, ज्ञानसेवा मजबूत करा” हा संदेश देत ग्रंथालयांचे अस्तित्व टिकविणे आणि ज्ञानसेवा अधिक सक्षम करणे हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सुभाष सोळंके आणि सचिव गुलाबराव मगर यांनी सर्व संबंधितांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
– महाराष्ट्र न्यूज टाईम
संपादक -दिनेश गायके
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
ग्रंथालयांच्या मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
Related Posts
Add A Comment

