Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

“ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक घरात… सकारात्मक पत्रकारितेचा नवा अध्याय – ‘ज्ञान सेतू'”

July 17, 2026

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात कंत्राटी पदभरतीला विभागीय आयुक्तांची मंजुरी

July 17, 2026

स्पिक मॅके’च्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

July 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»अमलीपदार्थांविरोधात जनजागृती; विद्यार्थी, व्यसनमुक्ती केंद्रे आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
छत्रपती संभाजीनगर

अमलीपदार्थांविरोधात जनजागृती; विद्यार्थी, व्यसनमुक्ती केंद्रे आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comJune 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगरात ‘जागतिक व्यसनमुक्ती दिन’ उत्साहात साजरा

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : पोलिस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगरच्या अमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाच्या वतीने २६ जून रोजी ‘जागतिक व्यसनमुक्ती दिन’ विविध जनजागृती उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. युवकांना अमलीपदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवणे आणि व्यसनमुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने शहरातील विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रम, कार्यशाळा आणि बैठकींचे आयोजन करण्यात आले.

पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अमलीपदार्थांविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत पुणे येथील व्यसनमुक्ती केंद्र ‘उन्मेष’ तसेच ‘अलन करिअर इन्स्टिट्यूट’ यांच्या सहकार्याने जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अमलीपदार्थांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच जनजागृतीपर पोस्टर्स व माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले.

सिडको पोलीस ठाण्यामार्फत एमजीएम महाविद्यालयात तर सातारा पोलीस ठाण्यामार्फत एमआयटी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्यसनमुक्तीचा संदेश समाजात पोहोचविण्याचा संकल्प केला.

पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-२) रत्नाकर नवले यांच्या उपस्थितीत शहरातील आठ व्यसनमुक्ती केंद्रांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये अमलीपदार्थांविरोधातील जनजागृती अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी भारतभर सायकलद्वारे व्यसनमुक्तीचा संदेश देणारे सायकलपटू सुभाष गंगुर्डे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अमलीपदार्थांची विक्री व तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, तसेच माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन करण्यात आले.

सदर उपक्रम पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) प्रशांत महाले, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-२) रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली अमलीपदार्थ प्रतिबंधक विभाग, सिडको व सातारा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

“ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक घरात… सकारात्मक पत्रकारितेचा नवा अध्याय – ‘ज्ञान सेतू'”

July 17, 2026

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात कंत्राटी पदभरतीला विभागीय आयुक्तांची मंजुरी

July 17, 2026

स्पिक मॅके’च्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

July 17, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

“ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक घरात… सकारात्मक पत्रकारितेचा नवा अध्याय – ‘ज्ञान सेतू'”

By Maharashtranewstimes2026@gmail.comJuly 17, 20260
Spread the love

प्रिय वाचक, हितचिंतक आणि शिक्षणप्रेमींनो… आपल्या सर्वांच्या प्रेम, विश्वास आणि सहकार्यामुळे “महाराष्ट्र न्यूज टाईम” या…

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात कंत्राटी पदभरतीला विभागीय आयुक्तांची मंजुरी

July 17, 2026

स्पिक मॅके’च्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

July 17, 2026

दिलखुलास’मध्ये पंढरपूर वारीच्या यशस्वी प्रशासकीय व्यवस्थापनाचा वेध यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे यांची विशेष मुलाखत

July 17, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.