फॅक्ट चेक
प्रतिनिधी |
सोशल मीडियावर सध्या “1 जुलैपासून 2005 पूर्वी छापलेल्या नोटा बंद होणार असून त्या त्यापूर्वी बँकेत जमा कराव्या लागतील” असा संदेश मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मात्र, या दाव्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 1 जुलै 2026 पासून 2005 पूर्वीच्या नोटा अवैध ठरणार किंवा देशात पुन्हा नोटबंदी होणार असल्याची कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.
यापूर्वी 2005 पूर्वीच्या नोटा टप्प्याटप्प्याने चलनातून कमी करण्यासाठी RBI ने काही प्रक्रिया राबविल्या होत्या. मात्र, त्याचा अर्थ नवीन नोटबंदी असा होत नाही. सोशल मीडियावरील जुनी माहिती आणि दिशाभूल करणारे संदेश पुन्हा व्हायरल करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे.
नागरिकांना आवाहन : कोणतीही आर्थिक किंवा बँकिंगविषयक माहिती फक्त RBI किंवा भारत सरकारच्या अधिकृत माध्यमांवरूनच तपासा. सोशल मीडियावर आलेले अप्रमाणित संदेश पुढे पाठविण्यापूर्वी त्यांची खात्री करून घ्या. अफवा पसरविण्याऐवजी सत्य माहितीच प्रसारित करा.
महाराष्ट्र न्यूज टाईम
संपादक-दिनेश गायके

