छत्रपती संभाजीनगर खुलताबाद, 26जून (एस के शेख – प्रतिनिधी) : पत्रकारांना धमकी दिल्याच्या प्रकरणी खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात राज्यभर संतापाची लाट उसळली असून, खुलताबाद तालुक्यातील पत्रकारांनीही तीव्र भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर खुलताबाद तालुका पत्रकार संघाच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना निवेदन देऊन खासदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
पत्रकारांशी बोलताना खासदार संजय दिना पाटील यांनी धमकीची भाषा वापरल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या घटनेचा विविध पत्रकार संघटना, सामाजिक संघटना आणि राजकीय स्तरावर निषेध व्यक्त करण्यात आला. या घटनेनंतर त्यांनी सार्वजनिकरित्या दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली असली, तरी पत्रकार संघटनांनी केवळ माफी पुरेशी नसून कायद्यापुढे सर्व समान आहेत, त्यामुळे योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी, अशी भूमिका कायम ठेवली आहे.
खुलताबाद तालुका पत्रकार संघाच्या प्रतिनिधींनी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना दिलेल्या निवेदनात, लोकप्रतिनिधींनी पत्रकारांशी सन्मानपूर्वक वागणे अपेक्षित असताना अशा प्रकारची धमकी लोकशाहीतील चौथ्या स्तंभावरच आघात असल्याचे नमूद केले आहे. पत्रकारांवर दबाव निर्माण करण्याचा किंवा धमकावण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू असून विविध पत्रकार संघटनांनीही निषेध नोंदवत कठोर कारवाईची मागणी केली आहे. माफी मागितल्यामुळे वाद शांत होईल की कायदेशीर कारवाई पुढे जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-महाराष्ट्र न्यूज टाईम
संपादक दिनेश गायके
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
खासदारांकडून पत्रकारांना धमकीप्रकरणी खुलताबाद तालुक्यात संताप; माफी मागूनही कारवाईच्या मागणीवर पत्रकार संघ ठाम
Related Posts
Add A Comment

