छत्रपती संभाजीनगर, दि. 24 (प्रतिनिधी): अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार तात्काळ लागू करावे तसेच मातंग समाजाच्या शासन दरबारी प्रलंबित विविध मागण्या मार्गी लावाव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी लहु प्रहार संघटनेच्या वतीने उद्या (दि. 25 जून) विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात देवाला प्रसन्न करण्याच्या प्रतीकात्मक स्वरूपात ‘नारळ अभिषेक’ करण्यात येणार असून, दुपारी 3.30 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. लहु प्रहार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.
मातंग समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
या आंदोलनात राज्य कार्याध्यक्ष कचरू कांबळे, राज्य उपाध्यक्ष संदीप चांदणे, राज्य महासचिव राहुल घोरपडे, प्रवक्ते आनंद लोखंडे, संपर्क प्रमुख मुकेश जाधव, राज्य संघटक मच्छिंद्र बहिलम, मराठवाडा अध्यक्ष यशराज इंचाळकर, युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष संदीप वैरागळ यांच्यासह महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली पवार आणि इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
संघटनेने समाजातील नागरिकांना या आंदोलनात सहभागी होऊन मागण्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
देवाला प्रसन्न करण्यासाठी लहु प्रहार संघटनेचा उद्या ‘नारळ अभिषेक’ आंदोलन
Related Posts
Add A Comment

