छत्रपती संभाजीनगर, दि. २४ : मोहरम सणानिमित्त शहरात निघणाऱ्या सवारी, पंजे व मातम मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक शाखेने वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत. याबाबत शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंदनसिंग धुणावत यांनी आदेश जारी केले आहेत.
प्रेसनोटनुसार, २६ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून २७ तारखेला मिरवणुका संपेपर्यंत महात्मा गांधी पुतळा, मुख्य पोस्ट ऑफिस, जुना बाजार, गुलमंडी, पोलीस स्टेशन सिटी चौक या मार्गावरील जाणारी व येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे.
तसेच, क्रांती चौक ते गोपाल टी हा एकेरी मार्ग करबला (मेळावा) संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. करबला मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक व नागरिक उपस्थित राहणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग
➡️ महानगरपालिका – कमाठी लॉज – लोटाकारंजा – मंजूरपुरा – चेलीपुरा मार्गे वाहतूक वळविण्यात येईल.
➡️ बाराभाई ताडिया – दिवाण देवडी – जुना मोढा मार्गाचा वापर करता येईल.
➡️ गोपाल टी ते क्रांती चौककडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी एकेरी मार्ग उपलब्ध राहील.
वाहतूक परिस्थितीनुसार बंदोबस्त अधिकारी आवश्यकतेनुसार मार्गात बदल करू शकतील. पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि अत्यावश्यक सेवा वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
वाहतूक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायदा व भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
मोहरम मिरवणुकीमुळे छत्रपती संभाजीनगरात वाहतुकीत बदल
Related Posts
Add A Comment

