मुंबई, दि. २४ : परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने आरटीओ कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप मागे घेतला आहे. त्यामुळे राज्यातील परिवहन विभागाचे कामकाज पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, परिवहन विभागातील कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी १६ जून २०२६ पासून बेमुदत संप पुकारला होता. या आंदोलनामुळे राज्यातील लाखो नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. शासनाने कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि अपेक्षा समजून घेत सकारात्मक चर्चा केली.
चर्चेनंतर शासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. कार्यालयीन अधीक्षक पदावरील तात्पुरत्या पदोन्नतीचे आदेश पुढील तीन महिन्यांसाठी तातडीने नूतनीकरण करण्यात येणार आहेत. तसेच या पदोन्नतीला ११ महिन्यांपर्यंत मुदतवाढ देण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाची मान्यता घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
याशिवाय वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी पदांच्या २३ पदोन्नतींचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्यात आला असून मंजुरी मिळताच पदोन्नती आदेश जारी करण्यात येणार आहेत.
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, कार्यालयीन अधीक्षक आणि वर्ग-३ संवर्गातील पदांचे सेवा प्रवेश नियम अंतिम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच लिपिक, टंकलेखक आणि वरिष्ठ लिपिक या पदनामांमध्ये बदल करून अनुक्रमे ‘परिवहन सहाय्यक’ आणि ‘वरिष्ठ परिवहन समन्वयक सहाय्यक’ अशी पदनामे देण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस मोटार वाहन अभियोजन पदाच्या सेवा प्रवेश नियमांना अंतिम मंजुरी देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच वरिष्ठ लिपिक आणि कार्यालयीन अधीक्षक पदावरील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश परिवहन आयुक्तांना देण्यात आले आहेत.
शासन कर्मचाऱ्यांचा सन्मान, त्यांच्या समस्या आणि भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगताना मंत्री सरनाईक यांनी संवाद, संवेदनशीलता आणि समन्वयाच्या माध्यमातून परिवहन विभाग अधिक सक्षम, कार्यक्षम आणि जनाभिमुख करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले.
कर्मचारी संघटनांनी शासनाच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत करत बेमुदत संप मागे घेतला असून, त्यामुळे नागरिकांना होणारी गैरसोय टळली आहे.
हॅशटॅग
#RTOStrike #RTOEmployees #PratapSarnaik #TransportDepartment #MaharashtraGovernment #EmployeeIssues #RTONews #MaharashtraNews #TransportNews #Mumbai #BreakingNews #MaharashtraNewsTimes #GovernmentDecision #EmployeeWelfare #RTOServices #StateNews
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे; विविध मागण्यांवर शासनाची सकारात्मक भूमिका कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत विविध मागण्या मान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
Related Posts
Add A Comment

