Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

“ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक घरात… सकारात्मक पत्रकारितेचा नवा अध्याय – ‘ज्ञान सेतू'”

July 17, 2026

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात कंत्राटी पदभरतीला विभागीय आयुक्तांची मंजुरी

July 17, 2026

स्पिक मॅके’च्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

July 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर

विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे आवाहन

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comJune 24, 2026Updated:June 25, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर, दि. २४ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अप्पर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी S. Chokkalingam यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा व मार्गदर्शन बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागातील जिल्हाधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी तसेच निवडणूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री. चोक्कलिंगम यांनी सांगितले की, मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मदत कक्ष उभारण्यात यावेत तसेच लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) आणि स्वयंसेवक यांना सहभागी करून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

कोणत्याही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही, तसेच अपात्र नोंदींची काटेकोर छाननी करूनच निर्णय घेण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय संविधान, लोकप्रतिनिधी कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांच्या आधारे कायदेशीर तरतुदीनुसार कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

३० जून ते २९ जुलैदरम्यान घराघरात पडताळणी

विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्जांचे वितरण व संकलन करतील. यावेळी मतदारांचे नाव, पत्ता, छायाचित्र आणि इतर तपशीलांची पडताळणी करण्यात येणार आहे.

तसेच अनुपस्थित, स्थलांतरित, मृत अथवा डुप्लिकेट नोंदींची तपासणी करून मतदार यादी अधिक अचूक करण्यावर भर दिला जाणार आहे. संपूर्ण माहिती डिजिटल पद्धतीने वेळेत अद्ययावत करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

लोकशाही बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण मोहीम

बैठकीत विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील तयारीचा आढावा सादर केला. प्रशिक्षण, जनजागृती, मतदार यादी मॅपिंग, बीएलओ नियुक्ती, अर्ज वितरण व पडताळणी प्रक्रिया यासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी Rahul Kardile, Vivek Johnson, Sanjaysingh Chavan, Kirti Kiran Pujar, Rahul Gupta, Ashima Mittal यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

— महाराष्ट्र न्यूज टाइम्स

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

“ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक घरात… सकारात्मक पत्रकारितेचा नवा अध्याय – ‘ज्ञान सेतू'”

July 17, 2026

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात कंत्राटी पदभरतीला विभागीय आयुक्तांची मंजुरी

July 17, 2026

स्पिक मॅके’च्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

July 17, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

“ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक घरात… सकारात्मक पत्रकारितेचा नवा अध्याय – ‘ज्ञान सेतू'”

By Maharashtranewstimes2026@gmail.comJuly 17, 20260
Spread the love

प्रिय वाचक, हितचिंतक आणि शिक्षणप्रेमींनो… आपल्या सर्वांच्या प्रेम, विश्वास आणि सहकार्यामुळे “महाराष्ट्र न्यूज टाईम” या…

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात कंत्राटी पदभरतीला विभागीय आयुक्तांची मंजुरी

July 17, 2026

स्पिक मॅके’च्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

July 17, 2026

दिलखुलास’मध्ये पंढरपूर वारीच्या यशस्वी प्रशासकीय व्यवस्थापनाचा वेध यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे यांची विशेष मुलाखत

July 17, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.